ठळक बातम्या

    *भारतीय जनता पार्टी वणी शहरातर्फे ‘तान्हा पोळा सजावट स्पर्धा २०२६’चे आयोजन*

     



    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी: भारतीय जनता पार्टी वणी शहराच्या वतीने वणी शहरातील बालगोपालांच्या कलागुणांना व सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी *‘तान्हा पोळा सजावट स्पर्धा २०२६’* या आकर्षक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

    :- ही स्पर्धा *शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता कल्याण मंडपम, मोठा हनुमान मंदिराजवळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, वणी येथे आयोजित करण्यात आली आहे.* या स्पर्धेत प्रवेश *निःशुल्क* असून वणी शहरातील बालगोपालांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

    :- स्पर्धेसाठी दोन वयोगट निश्चित करण्यात आले आहेत.

    *‘अ’ गटवय १ ते ५ वर्षे*

    🥇 प्रथम क्रमांक – ₹५,०००

    🥈 द्वितीय क्रमांक – ₹३,०००

    🥉 तृतीय क्रमांक – ₹२,०००


    *‘ब’ गट – वय ६ ते १२ वर्षे*

    🥇 प्रथम क्रमांक – ₹४,०००

    🥈 द्वितीय क्रमांक – ₹३,०००

    🥉 तृतीय क्रमांक – ₹२,०००

    याशिवाय *प्रत्येक गटासाठी ₹१,००० ची ०३ प्रोत्साहनपर बक्षिसे ठेवण्यात आली असून सहभागी बालगोपालांसाठीही आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत.*

    :- *स्पर्धेतील सजावट पर्यावरणपूरक व स्वदेशी वस्तूंच्या माध्यमातून करण्यात यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.* 

    स्पर्धकांनी दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत नोंदणी करावी. तसेच स्पर्धेच्या वेळेच्या किमान १० मिनिटे आधी उपस्थित राहणे आवश्यक आहे.

    :- या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या पारंपरिक पोळा सणाची संस्कृती, बैलांविषयीचा स्नेह आणि पर्यावरणपूरक सजावटीचा संदेश बालगोपालांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

    स्पर्धेचे संयोजक श्री रवि    बेलूरकर, जिल्हा उपाध्यक्ष, यवतमाळ असून स्पर्धेसाठी सौ नीता पिदूरकर, श्रीमती वैशाली वातिले, सौ प्रतिभा मंथनवार , श्री विलास डवरे , श्री मयूर गोयनका व श्री नितीन बिहारी* हे सहसंयोजक म्हणून कार्यरत आहेत.

    वणी शहरातील पालकांनी आपल्या पाल्यांना या स्पर्धेत सहभागी करून त्यांच्या कलागुणांना व सर्जनशीलतेला व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन *माजी आमदार श्री संजीवरेड्डी बोदकुरवार आणि ॲड. निलेश माया महादेवराव चौधरी, शहर अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी वणी यांनी केले आहे.*

    Photo