ठळक बातम्या

    वणीमध्ये शिवसेने तर्फे ११ सप्टेंबरला भव्य तान्हा पोळा उत्सव; २० सायकल बक्षिसांची लयलूट

     शिवसेना वणीच्या संयुक्त विद्यमाने आयोजन; शेतकरी बांधवांच्या बैलपोळ्याला व बाल गोपालांच्या तान्हा पोळ्याला हार्दिक शुभेच्छा

    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : शिवसेना वणीच्या संयुक्त विद्यमाने वणी शहरात भव्य तान्हा पोळा उत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी वाजता शासकीय पाण्याची टाकी, वणी येथे हा उत्सव उत्साहात पार पडणार आहे.

    या तान्हा पोळा उत्सवात सहभागी होणाऱ्या बालगोपालांसाठी विविध आकर्षक उपक्रम व बक्षिसांची मेजवानी ठेवण्यात आली आहे. एकूण २० सायकली बक्षिसे देण्यात येणार असून, यामध्ये विविध वयोगटांनुसार स्पर्धा घेण्यात येणार आहे.

    गट ‘अ’ (वय ० ते ४ वर्षे) यामध्ये १ इलेक्ट्रिक ट्रायसायकल, ३ ट्रायसायकली आणि १ स्कूटर, तर गट ‘ब’ (वय ४ ते ६ वर्षे), गट ‘क’ (वय ६ ते ८ वर्षे) आणि गट ‘ड’ (वय ८ ते १२ वर्षे) यांच्यासाठी प्रत्येकी ४ सायकलींची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

    उत्सवात सहभागी होण्यासाठी प्रवेश पूर्णपणे निःशुल्क असून प्रवेशाची मर्यादा ३०० नोंदणीपर्यंत ठेवण्यात आली आहे. सर्व सहभागी स्पर्धकांसाठी प्रोत्साहनपर बक्षिसेही देण्यात येणार आहेत.

    या भव्य तान्हा पोळा उत्सवाचे आयोजन शिवसेना जिल्हा संघटक, यवतमाळ श्री. विजय चोरडिया यांच्या वतीने करण्यात आले आहे. वणी शहरातील नागरिकांनी व बालगोपालांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.



    Photo