विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : सामाजिक कार्याची सातत्यपूर्ण धडपड, गरजूंना मदतीचा हात आणि रुग्णसेवेची तळमळ यामुळे विजयबाबू चोरडिया यांनी आपल्या कार्यातून समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचा ४ सप्वाटेंबर ला वाढदिवस असून, या निमित्ताने विविध स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
राजकारणात पद, प्रतिष्ठा आणि राजकीय ताकद यांची चर्चा होत असली, तरी सामान्य माणसाच्या सुख-दुःखात धावून जाणारे व्यक्तिमत्त्व म्हणून विजयबाबू चोरडिया यांच्याकडे पाहिले जाते. गरजू रुग्णांना मदत, आरोग्यविषयक उपक्रम, नेत्रदान व आरोग्य शिबिरांचे आयोजन तसेच सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे.
अडल्या-नडलेल्यांसाठी मदतीचा हात पुढे करणे, त्यांच्या अडचणी समजून घेऊन शक्य ती मदत करण्याची भूमिका यामुळे परिसरातील नागरिकांशी त्यांचा आपुलकीचा संबंध निर्माण झाला आहे. प्रसिद्धीपेक्षा सामाजिक कार्याला महत्त्व देत सामान्य नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान आणण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे त्यांच्या कार्यातून दिसून येते.
“माणुसकीची ओळख जपणारा समाजसेवक” अशी प्रतिमा निर्माण केलेल्या विजयबाबू चोरडिया यांना वाढदिवसानिमित्त सामाजिक, राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच मित्रपरिवार आणि नागरिकांकडून मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या जात आहेत.
मा. श्री. विजय बाबू चोरडिया
यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि आपल्या सर्व कार्यात यश लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस आनंद, समाधान आणि यशाने उजळून निघो!
शुभेच्छूक :
कपिल कुंटलवार | सौरभ राजुरकर | शुभम गोरे | पार्थ त्रिवेदी

