ठळक बातम्या

    गृहनिर्माण सोसायटीतील वाढलेल्या गवतावर सामाजिक कार्यकर्त्यांची फवारणी; साप-विंचूंपासून नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुढाकार

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : गृहनिर्माण सोसायटी परिसरातील ओपन स्पेसमध्ये मोठ्या प्रमाणात गवत व इतर वनस्पती वाढल्याने योगासाठी येणारी लहान मुले तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. वाढलेल्या गवतामुळे साप, विंचू तसेच विषारी कीटकांचा वावर होण्याची शक्यता लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत परिसराची स्वच्छता व सुरक्षिततेसाठी फवारणी केली.

    शनिवार, २६ सप्टेंबर २०२६ रोजी वार्डातील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप वासेकर, अक्षय गोखरे, चेतन मत्ते, अक्षय वाघमारे आणि शुभम लखमापूरे यांनी स्वतः गवत नष्ट करणारे औषध आणून ओपन स्पेसमध्ये फवारणी केली. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही तक्रार किंवा अपेक्षा न ठेवता त्यांनी हा उपक्रम राबविला.

    या परिसरात नियमितपणे योगाभ्यासासाठी लहान मुले व नागरिक येत असतात. त्यामुळे वाढलेले गवत व वनस्पती हटविण्याच्या या उपक्रमामुळे संभाव्य धोका कमी होण्यास मदत होणार आहे.

    सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतलेल्या या पुढाकाराचे गृहनिर्माण, आवारी लेआऊट आणि भोंगळे लेआऊट परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत असून, सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या या कार्याचे नागरिकांनी स्वागत केले आहे.

    Photo