विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : भारतीय जनता पार्टी यवतमाळ जिल्हा ओ.बी.सी. अध्यक्ष मा. श्री. पवण राम ऐकरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम आणि शुभेच्छांच्या वातावरणात साजरा होत आहे.
सामाजिक कार्याची नाळ घट्ट जोडून समाजातील सर्वसामान्य नागरिकांच्या सुख-दुःखात सदैव सहभागी होणारे व्यक्तिमत्त्व म्हणून पवण ऐकरे यांनी जनमानसात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. कोणताही भेदभाव न करता गरजूंच्या मदतीसाठी पुढाकार घेणे, सामाजिक प्रश्नांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविणे आणि समाजबांधवांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहणे, ही त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये आहेत.
निस्वार्थ सेवा, सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचा जिव्हाळा या त्रिसूत्रीच्या माध्यमातून त्यांनी सर्व समाजबांधवांशी आपुलकीचे नाते निर्माण केले आहे. त्यामुळे सामाजिक कार्यातून ते जनमानसातील विश्वासाचे आणि आपुलकीचे व्यक्तिमत्त्व बनले असून, सर्व समाजबांधवांच्या गळ्यातील ताईत म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
वाढदिवसानिमित्त त्यांच्या सामाजिक कार्याला अधिक बळ मिळावे, त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि भावी वाटचालीस यश लाभावे, अशा मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
मा. श्री. पवण राम ऐकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


