विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : शिक्षण प्रसारक मंडळ वणी संचालक लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभाग तथा एम.जी.एस.टी.या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य टिळक सभागृहामध्ये स्वरधारा या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महाविद्यालयीन विद्यार्थी तथा स्थानिक कलाकारांना एक हक्काचे व्यासपीठ मिळावे या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या प्रीती पावडे हिने- इष्क वालो को, लवकिता देठे -ये इश्क हायें, श्रेया मते - केतकीच्या बनी तिथे,
कल्याणी रामावार- अजीब दास्ता है , कामाक्षी आंबुलकर- रहे ना रहे, अंकिता कळसकर - वाटेवरी मोगरा तर स्वाती पारखी- आताच बया का यांनी गीतांचे सादरीकरण केले.
त्यासोबतच एम.जी.एस.टी. चे सदस्य, महमुद खान - तुम अगर साथ देने का, विशाल सूत्रावे / सुप्रिया केदार - हे नाम रे,मोरे परदेसिया; मेदिनी मुहार - घर मोरे, ऐश्वर्या मुहार न जाने क्यूँ,नरेंद्र मुहार - आसुग्री है ये जीवन की राहे,हिना मेहता - दिल को हजार बार,अयुब खान - तेरी आँखो के सिवा,निखिल साठे - फुलो फुट के रंगसे,भारती दारव्हेकर - आओ हुजुर तुमको
सुप्रिया केदार - शारद सुंदर चंदेरी राती,रफिक खान -जिंदगी का का सफर,डॉ. दीपक हूड -तुझे क्या सुनाऊ,राजेश नागदेव - जो तुमको हो पसंद,विशाल सूत्रावे - आते जाते खुबसूरत, मंगेश चिंचोळकर - वो कहते है हमसे
यांनी आपली कला सादर केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ दीपक हूड आणि सुप्रिया केदार यांनी केले तर आभार प्रदर्शन विद्यार्थी विकास विभागाचे संयोजक डॉ अभिजित अणे यांनी केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रसाद खानझोडे यांनी स्थानिक आणि नवोदित कलाकारांना संधी देण्याच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय बिलोरिया, नितेश चामाटे, पंकज सोनटक्के यांनी विशेष परिश्रम घेतले. वणीकर जनतेने मोठ्या संख्येने दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.

