विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाचा स्वयंसेवक कृष्णा जयप्रकाश डबरे याची दि. १७ ते २६ नोव्हेंबर, २०२६ या कालावधीत,अटल बिहारी वाजपेई इंस्टीट्यूट ऑफ माउंटनेअरींग ॲड इलाईट स्पोर्ट रिव्हर राफ्टींग सेंटर, पिरडी कुल्लु, हिमाचल प्रदेश येथे आयोजित राष्ट्रीय साहसी शिबीर २०२६-२७ करिता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना चमूमध्ये निवड करण्यात आलेली आहे.
आरंभी जिल्हास्तरावर आणि नंतर विद्यापीठ स्तरावर झालेल्या विविध पात्रता परीक्षांमधून निवडण्यात आलेल्या आठ विद्यार्थी विद्यार्थिनींमध्ये त्याचा समावेश ही महाविद्यालयाच्या दृष्टीने सार्थ अभिमानाची गोष्ट आहे.
तो आपल्या यशाचे श्रेय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रसाद खानझोडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ नीलिमा दवणे तथा डॉ. विकास जुनगरी यांच्या मार्गदर्शनाला प्रदान करतो.
त्याच्या या वैशिष्ट्यपूर्ण उपलब्ध बद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय मुकेवार तथा प्राचार्य डॉ प्रसाद खानझोडे यांनी त्याचे कौतुक केले. शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व संचालक तथा महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्याद्वारे त्याचे आणि मार्गदर्शकांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
