मारेगाव तालुक्यातील वनपरिक्षेत्र कार्यालयामार्फत मारेगाव, बोटोनी, खंडणी, वडकी, राळेगाव राऊंडमध्ये राज्य वार्षिक योजना,जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत वेगवेगळी कामे केली गेली. ही कामे प्रत्यक्ष मजुरांच्या हाताने केली जातात.तसेच मजुरांच्याच नावाने पैसे सुद्धा काढले जातात. परंतु यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे. यामध्ये प्रत्यक्ष कामावर कमी मजूर लावून जास्त मजुरांचे नावाने पैसे काढल्या गेले. तसेच हे पैसे काढताना जे मजूर कामावर होते त्यांच्या नावाने न काढता जे मजूर कामावर नाहीत, काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांच्या नावाने सुद्धा पैसे काढल्या गेले.यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला.
