ठळक बातम्या

    कापूस खरेदीला वणी तालुक्यात प्रारंभ

    केंद्रीय कपास महामंडळ अर्थात सी.सी.आय. (Central Cotton Corporation) तर्फे वणी तालुक्यातील कायर उपबाजार हद्दीत आजपासून कापूस खरेदीला अधिकृत प्रारंभ झाला. या खरेदी मोहिमेचा शुभारंभ नवरगाव येथील जिनिंग व प्रेसिंग फॅक्टरीमध्ये करण्यात आला. पहिल्या दिवशी तीन शेतकऱ्यांनी आपल्या तीन वाहनांद्वारे कापूस आणत या खरेदी केंद्रावर विक्री केली, ज्यातून शासकीय दराने प्रती क्विंटल ₹8,069.50 रुपये दर देण्यात आला.


    खरेदीचा शुभारंभ श्री. विजयराव गारघाटे, उपसभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती वणी यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. दिनकर पावडे पाटील, राज्य परिषद सदस्य तसेच प्रदेश उपाध्यक्ष, किसान मोर्चा (भाजपा), तसेच श्री. अशोकराव पिदुरकर, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती वणी, उपस्थित होते.

    Photo