दि. २३/१०/२०२५ रोजी सायंकाळी ४:०० वाजताच्या सुमारास मृतक स्वप्नील किशोर राऊत (वय २६, व्यवसाय-मजुरी, रा. रंगनाथनगर, वणी, ता. वणी, जि. यवतमाळ) याला एका अज्ञात व्यक्तीकडून फोन आला. फोनवर ठेकेदाराकडून पैसे आणायचे असल्याचे सांगितले गेले. स्वप्नील घरातून बाहेर पडला, मात्र सायंकाळी ६:०० वाजता पत्नीने त्याला फोन केला असता तो लवकरच घरी येईल असे सांगून फोन संपवला.
रात्री ८:०० वाजता त्याचा फोन बंद लागल्याचे कुटुंबीयांना लक्षात आले. दि. २४/१०/२०२५ रोजी सकाळी ६:०० वाजता कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. सायंकाळी ६:०० वाजताच्या सुमारास मित्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, गजानन नगरी, वडगाव टीप रोड, वणी येथे मृतदेह असल्याची माहिती मिळाली.
फिर्यादी चेतन किशोर राऊत (वय २८, मृतकाचा मोठा भाऊ, व्यवसाय–किराणा दुकान) यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता, स्वप्नीलचा मृतदेह गळा आणि डोक्याला गंभीर मार लागलेल्या अवस्थेत रक्तरंजित अवस्थेत आढळला.
