विदर्भ वार्ता|प्रतिनिधी
वणी:वणी येथील येरेंडेल तेली समाजबांधव यांच्या वतीने संत शिरोमणी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली,प्रसंगी संताजी महाराज यांच्या फोटोला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. प्रसंगी येरेंडेल तेली समाज हितकारणी मंडळ वणी ची कार्यकारणी तयार करण्यात आली यात संस्थेचे उद्धीष्ट ठरविण्यात आली.
समाजहितावह बाबीस तत्पर,वर वधू परिचय मेळावे,सामूहिक विवाह सोहळा,गुणवंत विदयार्थी सत्कार सोहळे,व इतर
समाजपयोगी शैक्षणीक,क्रीडा उपक्रम चालविन्याकरिता सभा घेण्यात आली सभेत संस्था स्थापन करून पदाधिकारी यांची निवड करण्यात आली, त्यातअध्यक्ष म्हणून शरद रामराव तराळे, उपाध्यक्ष संजय तुळशीराम सहारे, सचिव सागर सुधाकर समर्थ, सहसचिव राहुल सुरेश कोलते,कोषाध्यक्ष मोहन भास्कर भरटकर,संचालक किशोर गुलाब तराळे,प्रशांत आनंदराव कावळे लोकेश रामजी तराळे,गणेश कैलास भरटकर, गणेश कैलास
भरटकर, अक्षय बबन समर्थ व मार्गदर्शन करण्याकरिता जेष्ठ समाज बांधव यांची उपस्थिती होती.



