विदर्भ वार्ता|प्रतिनिधी

 वणी : येथील प्रेस वेलफेअर असोसिएशनची कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून अध्यक्ष पदी अनिल बिलोरिया तर सचिव पदी सागर बोढे यांची निवड करण्यात आली आहे.  

प्रेस वेलफेअर असोशिएच्या कार्यकारणी निवडी करिता येथील नगर वाचनालयात बैठक आयोजित करण्यात आली होती या वेळी सर्वानुमते अध्यक्ष अनिल बिलोरिया, उपाध्यक्ष रमेश तांबे, सचिव सागर बोढे, सह सचिव जितेंद्र डाबरे, कोषाध्यक्ष पदी तुषार अतकारे तर कार्यकारणी मध्ये गजानन कासावर, विनोद ताजने, रवी बेलूरकर, डॉ किशोर चवणे, मंगल तेलंग, असिफ शेख यांची निवड करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दीपक नवले यांनी काम पाहिले.