ठळक बातम्या

    दुःखद वार्ता : धोबी समाजातील विनोद भोस्कर यांचे निधन

     


    विदर्भ वार्ता|प्रतिनिधी

    घुग्घुस : दि. १ जानेवारी २०२६ ला धोबी समाजातील एक सदस्य आपल्यातून निघून गेल्याची अत्यंत दुःखद वार्ता समोर आली आहे. विनोद रामचंद्र भोस्कर यांचे दि. १/१/२०२६ रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने भोस्कर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण धोबी समाजात शोककळा पसरली आहे.

    विनोद भोस्कर हे मनमिळावू स्वभावाचे, सर्वांशी आपुलकीने वागणारे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. त्यांच्या निधनाने कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार व समाजबांधवांमध्ये तीव्र शोक व्यक्त करण्यात येत आहे.

    त्यांचा अंत्यविधी दि. २/१/२०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता श्री. विलास भोस्कर यांच्या राहत्या घरातून, घुग्घुस येथून हिंदू स्मशानभूमी येथे करण्यात येणार आहे.

    ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व भोस्कर परिवारास या दुःखातून सावरण्याचे बळ देवो, अशी प्रार्थना व्यक्त करण्यात येत आहे. 🙏

                        स्वर्ग वासी विनोद रामचंद्र भोस्करला 

        विदर्भ वार्ता|पत्र परीवारा कडून भावपूर्ण श्रध्दांजली👏

    Photo