ठळक बातम्या

    मारेगाव : सामाजिक कार्यकर्ते अमोल कुमरे यांची भाजप मारेगाव तालुका सचिवपदी नियुक्ती

     


    विदर्भ वार्ता|प्रतिनिधी

    मारेगाव : मारेगाव येथील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले युवा कार्यकर्ते अमोल कुमरे यांची भारतीय जनता पार्टी, मारेगाव तालुका सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे मारेगाव तालुक्यात भाजपाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळ मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

    आपल्या नियुक्तीचे श्रेय अमोल कुमरे यांनी भाजपाचे मारेगाव तालुका अध्यक्ष अविनाश लांबट तसेच तालुका सरचिटणीस प्रशांत नांदे यांना दिले. नियुक्तीबाबत प्रतिक्रिया देताना त्यांनी भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे आभार मानले असून, आपल्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी कर्तव्यभावनेने पार पाडून पक्षाच्या ध्येय-धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची ग्वाही दिली.

    अमोल कुमरे यांचा मारेगाव तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांशी व्यापक जनसंपर्क असून सामाजिक उपक्रमांमधील त्यांचा सक्रिय सहभाग सर्वश्रुत आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल मारेगाव तालुक्यातील विविध संघटना, कार्यकर्ते व नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून सर्वत्र या नियुक्तीचे स्वागत करण्यात येत आहे.

    आम्हचे मित्र अमोल कुंभरे यांची भारतीय जनता पार्टी मारेगाव
    च्या सचिव पदी नियुक्ती झाल्या बद्दल न्युज मिडीया व विदर्भ वार्ता मित्र परिवर कडून अमोल भाऊचे खुप.. खुप अभिनंदन 


    Photo