विदर्भ वार्ता|प्रतिनिधी
वणी : शहरातील जैन महिला मंडळाची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणीत अध्यक्षपदी सौ.नंदा भंडारी, उपाध्यक्षपदी श्रीमती किरण डुंगरवाल, सचिवपदी सौ. विद्या मुथा तर कोषाध्यक्षपदी सौ. अंशुमा अनिल झाबक यांची निवड करण्यात आली तर श्रीमती चंद्रकला बाई मुथा, सौ. कल्पना दिपक छाजेड, सौ. ममता कस्तुर सांड, सौ.वर्षा पंकज भंडारी, सौ. वंदना सतिश भंडारी, सौ.प्रियंका निलेश लोढा, सौ. वृशाली विशाल हिरण यांची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. सामाजिक, धार्मिक व सेवाभावी उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार नव्या कार्यकारिणीने व्यक्त केला आहे. मंडळाच्या सर्व सदस्यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
