विदर्भ वार्ता|प्रतिनिधी
वणी : धनोजे कुणबी समाज संस्था, वणी, मराठा सेवा संघ, वणी व छत्रपती संभाजी महाराज एकात्मिक फोरम, वणी यांच्या संयुक्त विद्यमाने वणी शहरात सामाजिक बांधिलकी जपत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार, दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता पार पडणार आहे.
सदर रक्तदान शिबिराचे आयोजन धनोजे कुणबी समाज सांस्कृतिक सभागृह, शेतकरी नगर, वणी येथे करण्यात आले असून या उपक्रमामागे रक्ताची वाढती गरज लक्षात घेऊन गरजू रुग्णांना वेळेवर रक्तपुरवठा होावा, हा मुख्य उद्देश आहे.
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून एका रक्तदात्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे समाजातील युवक, युवती तसेच सक्षम नागरिकांनी पुढाकार घेऊन या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
समाजहिताची जाणीव ठेवत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाला वणी शहरासह तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, असा विश्वास संयोजकांनी व्यक्त केला आहे.


