ठळक बातम्या

    नगर परिषद शाळांचा क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न


    विदर्भ वार्ता|प्रतिनिधी


     वणी : नगरपरिषद वणी  अंतर्गत आंतरशालेय क्रीडा व कला महोत्सव  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा क्रमांक सातच्या मैदानावर उत्साहात संपन्न झाला.  या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन  न.प. अध्यक्ष विद्याताई आत्राम  यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी नितीन कुमार हिंगोली उपस्थित होते . प्रमुख अतिथी म्हणून मुख्याधिकारी सचिन गाडे,  उपमुख्याधिकारी जयंत सोनटक्के,  प्रशासन अधिकारी गजानन  कासावार, नगरसेविका पुजाताई रामगीरवार, मनोज  सिडाम, धनराज भोंगळे उपस्थित होते . 

    याप्रसंगी सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांनी पाहुण्यांना मानवंदना दिली. या क्रीडा महोत्सवात वैयक्तिक स्पर्धेत 75 मीटर दौड, 100 मीटर दौड, लांब उडी इत्यादी खेळ खेळण्यात आले. त्याचबरोबर सांघिक खेळामध्ये कबड्डी, खो-खो ,लंगडी या खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असे प्रदर्शन केले .सोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असे नृत्याचे सादरीकरण केले. त्यासोबत पालकांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात पालकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देऊन कार्यक्रम यशस्वी करून दाखविला. 

    क्रीडा महोत्सवाचे बक्षीस वितरक म्हणून नगराध्यक्षा विद्याताई आत्राम होत्या.  अध्यक्ष म्हणून मुख्याधिकारी सचिन गाडे उपस्थित होते. त्यांनी  विद्यार्थ्यांना अमूल्य असे मार्गदर्शन केले. क्रीडा व कला महोत्सवांमध्ये सर्वसाधारण विजेतेपदाचा मान प्राथमिक गटात नगर परिषद शाळा क्रमांक सात यांना मिळाला. उपविजेतेपद शाळा क्रमांक एक व शाळा क्रमांक दोन यांना विभागून देण्यात आले. त्याचप्रमाणे उच्च प्राथमिक गटातील विजेतेपदाचा मान नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा क्रमांक चार यांना मिळाला तर उपविजेतेपद आयोजक शाळा नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा क्रमांक आठ यांना मिळाले. महोत्सवाच्या यशस्वी ते बद्दल नगराध्यक्ष तथा मुख्याधिकारी यांनी प्रशासन अधिकारी, केंद्र समन्वयक तथा सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.


    Photo