ठळक बातम्या

    दिं. १९ जाने सोमवारी रघुवंशम् च्या नवव्या सर्गाचे प्रकाशन डॉ. स्वानंद गजानन पुंड यांचा ९१ वा ग्रंथ


    विदर्भ वार्ता|प्रतिनिधी

     वणी : महाकवी कालिदास विरचित रघुवंशम् ग्रंथाचे प्रति श्लोक निरूपण करणाऱ्या विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड लिखित रघुवंशम् रसास्वाद मालिकेतील नवव्या सर्गाच्या निरूपणाचे संकलन आज ग्रंथरूपात प्रकाशित होत आहे.

             महाकवी कालिदासांच्या या नितांत रमणीय ग्रंथाचा हा नववा सर्ग महाराज दशरथाना समर्पित आहे. 

              महाराज अज यांच्यानंतर श्री दशरथांनी अयोध्येच्या राजसिंहासनावर आरूढ होण्यापासून या सर्गाचा आरंभ होतो. त्यांनी केलेला आदर्श राज्यकारभार, त्यानिमित्ताने त्यांना विविध देवतांच्या दिलेल्या अत्यंत समर्पक उपमा, त्यांचा दिव्य पराक्रम, दिग्विजय यात्रा, तीन राण्यांच्या सोबतचे विवाह, त्यानंतर केलेले यज्ञ, वसंत ऋतु चे अत्यंत विस्तृत स्वरूपातील विलोभनीय वर्णन, त्यामध्ये राजाच्या बहरलेल्या प्रेमलीलांचे रोमांचकारी वर्णन, त्यानंतर राजाच्या मनात जागृत झालेली शिकारीची इच्छा, मृगयेचे व्यापक वर्णन, विविध प्राण्यांचे आणि त्यांच्या सोबत राजाने केलेल्या वर्तनाचे प्रत्ययकारी वर्णन, शिकारीच्या शेवटी राजाच्या हाताने घडलेला भीषण अपराध, त्यामुळे प्राप्त झालेला शाप आणि त्या शापाने देखील वरदान वाटावे अशी राजाची अवस्था अशा अनेक गोष्टींनी हा सर्ग नटलेला आहे.

             यातील वसंत ऋतूच्या आणि शिकारीच्या वर्णनातील प्रत्येक श्लोकात आपण महाकवींना असंख्य साष्टांग दंडवत घालावेत असाच अनुभव आला नाही तरच नवल !

           लंडन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेली या लेखमालिकेच्या संकलन स्वरूपातील या ग्रंथाचा समस्त संस्कृत आणि संस्कृती प्रेमींनी लाभ घ्यावा असे आवाहन अविरत प्रकाशन जळगाव यांच्या द्वारे करण्यात येत आहे.


                           रघुवंशम् नवम सर्ग 

                        अविरत प्रकाशन जळगाव 

                            9028868953

                      मूल्य टपाल खर्चासह रु. १७०

    Photo