विदर्भ वार्ता|प्रतिनिधी
वणी : येथील शासकीय क्रीडांगणावर स्वर्गीय चंद्रदीप शिंदे सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. क्रीडा व सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या शिंदे सर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित या श्रद्धांजली कार्यक्रमास क्रीडाप्रेमी व नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेश पहापळे हे होते. प्रमुख उपस्थित म्हणून मुरलीधर भोयर, गणेश आसुटकर, मंगेश करंडे, अनिरुद्ध पात्रटकर, सतीश तेळेवार, नितीन मिलमिले, योगेंद्र शेंडे, सचिन टेकाम, रुपेश पिंपळकर, आझाद सिद्दिकी, सौरभ धोंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्व. चंद्रदीप शिंदे सर यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाचा गौरव करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या कार्यामुळे अनेक युवकांना क्रीडा क्षेत्रात दिशा मिळाल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश ठावरी यांनी केले तर आभार प्रदर्शन सतीश तेडेवार यांनी केले.
या श्रद्धांजली कार्यक्रमास युवा नवरंग क्रीडा मंडळ, संस्कार क्रीडा मंडळ, उडाण फिजिकल अकादमी, इलेव्हन क्रिकेट क्लब, युवा फुटबॉल क्लब तसेच समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

