विदर्भ वार्ता|प्रतिनिधी
वणी : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दिं. २३ जाने सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजी महाराज (शिवतीर्थ), वणी येथे छत्रपती शिवाजी महाराजांना हार अर्पण करून भगवा ध्वज फडकावून भव्य मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा उत्साहात व मोठ्या जनसहभागाने यशस्वीरीत्या पार पडली.
या मॅराथॉन स्पर्धेत युवक, महिला, बालक तसेच क्रीडाप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. स्पर्धा चार गटांमध्ये घेण्यात आली असून विजेते पुढीलप्रमाणे —
ओपन गट – मुले
प्रथम : विरोचन गोडे
द्वितीय : सौरभ दरणे
तृतीय : शिवम जंगठे
चतुर्थ : पियूष पडलमवार
ओपन गट – मुली
प्रथम : गौरी पांगुळ
द्वितीय : प्रशांती वसाके
तृतीय : अचल झिले
चतुर्थ : समीक्षा हनमंते
१६ वर्षांखालील गट – मुले
प्रथम : शिवम ओझा
द्वितीय : शिवम कुइटे
तृतीय : सुमित ढेंगळे
चतुर्थ : अयान सिद्दिकी
१६ वर्षांखालील गट – मुली
प्रथम : नव्या पिदुरकर
द्वितीय : पल्लवी ठाकरे
तृतीय : जानवी ठाकरे
चतुर्थ : श्रद्धा देशमुख
विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिसे व आकर्षक मोमेंटो देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेदरम्यान शिस्तबद्ध नियोजन, सुरक्षितता व उत्साही वातावरण अनुभवायला मिळाले.
हा उपक्रम मा. आमदार संजयभाऊ देरकर व किरणताई देरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाप्रमुख संजयजी निखाडे यांच्या मार्गदर्शनात पार पडला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नव्याने निवडून आलेले नगरसेवक यांचा यावेळी शाल व मोमेंटो देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे नेतृत्व व आयोजन युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य सु. शेंडे यांच्या वतीने करण्यात आले. या मॅराथॉन स्पर्धेमुळे युवकांमध्ये आरोग्य, क्रीडासंस्कृती व सामाजिक एकतेचा संदेश पोहोचल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांचे आयोजकांकडून आभार मानण्यात आले.
या कार्यक्रमाला शिवसेना व युवासेना पदाधिकारी तसेच महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. यामध्ये डॉ. संचिताताई नगराळे, सुरेखाताई ढेंगळे, दीपक कोकास, सुनील कातकडे, गणपत लेडांगे, आयुष ठाकरे, रवी बोढेकर, विनोद दुमणे, सुरेश शेंडे, राजू तुराणकर, अजय चन्ने, डॉ विलास बोबडे, टिकाराम खाडे,बबन केळकर, राजू पाटील, चेतन उलमले, मिलिंद बावणे, संजोग झाडे, कुणाल खामनकर, अक्षय लाडे व संस्कार हेपट यांची प्रमुख उपस्थिती होती.


