ठळक बातम्या

    कोरपना तालुका शेतकरी संघटनेचे नेते रमाकांत मालेकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

     


    विदर्भ वार्ता|प्रतिनिधी

    कोडसी : कोरपना तालुका शेतकरी संघटनेचे नेते, माजी पंचायत समिती उपसभापती तथा माजी ग्रामपंचायत सदस्य मा. रमाकांत मालेकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा होत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते व शेतकरी बांधवांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

    शेतकरी हितासाठी सातत्याने लढा देणारे, जनतेशी थेट संवाद ठेवणारे आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून रमाकांत मालेकर यांची ओळख आहे. पंचायत समिती उपसभापती तसेच ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांनी राबवलेली कामे आजही सर्वसामान्य जनतेच्या स्मरणात आहेत.

    त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा आदर्श नव्या पिढीला प्रेरणादायी ठरत असून पुढील काळातही ते जनहितासाठी कार्यरत राहतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

    याप्रसंगी माजी ग्रामपंचायत सदस्य संजय चिंचोलकर यांनी आपल्या राजकीय बंधू रमाकांत मालेकर यांना मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या दीर्घायुष्य व उत्तम आरोग्याची कामना केली आहे.

    विदर्भ वार्ता|पत्र न्यूज चॅनेल कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.... शुभेच्छा💐

    Photo