विदर्भ वार्ता|प्रतिनिधी
वणी : वणी तालुक्यातील मानकी ग्राम पंचायत कार्यालयात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी दोन्ही महान नेत्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमात बाळासाहेब ठाकरे यांच्या सामाजिक-राजकीय कार्याचा तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या देशभक्तीपूर्ण संघर्षाचा गौरव करण्यात आला.
या जयंती कार्यक्रमाला सरपंच कैलास पिपराडे, उपसरपंच शंकर माहुरे, ग्रां.पं.सदस्य नानाजी पारखी, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष परशुराम पोटे, प्रदिप मालेकर,अमर खुसपुरे, अविनाश सरवर ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
