ठळक बातम्या

    डेबु सावली वृध्दाश्रमाचे संस्थापक मा. सुभाष भाऊ शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

     


    विदर्भ वार्ता|प्रतिनिधी

    चंद्रपूर : डेबु सावली वृध्दाश्रमाचे संस्थापक तथा समाजसेवेचा आदर्श उभा करणारे मा. सुभाष भाऊ शिंदे यांचा वाढदिवस आज विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला. निराधार, उपेक्षित व वृद्धांच्या सेवेसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे सुभाष भाऊ शिंदे हे समाजासाठी प्रेरणास्थान ठरले आहेत.

    डेबु सावली वृध्दाश्रमाच्या माध्यमातून त्यांनी अनेक वृद्धांना आधार, मायेची सावली व सन्मानाचे जीवन दिले. त्यांच्या सेवाभावी कार्यामुळे समाजातील अनेक घटकांना नवी दिशा मिळाली असून, मानवतेचा खरा अर्थ त्यांनी कृतीतून दाखवून दिला आहे.

    वाढदिवसानिमित्त आश्रमातील ज्येष्ठ नागरिक, कार्यकर्ते, सामाजिक संस्था प्रतिनिधी व हितचिंतकांनी त्यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य व पुढील समाजसेवेसाठी बळ मिळावे, अशा शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यांच्या कार्यातून समाजात सेवा, संवेदना व माणुसकीचे मूल्य अधिक दृढ होत राहो, हीच सर्वांची सदिच्छा आहे.

    भाऊ तुम्हाला 

    विदर्भ वार्ता-संपादक संजय चिंचोलकर व चिंचोलकर परिवार कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐



    Photo