ठळक बातम्या

    प्रत्येक घरी सावित्रीबाईचा विचार निर्माण व्हावा - प्रा. पुरुषोत्तम पाटील

     


    विदर्भ वार्ता|प्रतिनिधी

    वणी : सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. पाटील सर, प्रमुख उपस्थिती नवनाथ नगराळे, प्रा. राजूरकर सर होते.

    सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमाना हार पुष्पमाला अर्पण करून दिप प्रजल्लीत करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नवनाथ नगराळे यांनी केले. त्यानंतर वसतीगृहाच्या बारा विद्यार्थ्यानी क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्यावर आपले मनोगत व्यक्त केले. त्यात विठ्ठल महादेव पारखी यांचा प्रथम क्रमांक , यशिद राजू नैताम व्दितीय क्रमांक, साहील प्रविण आसुटकर या विद्यार्थ्यांचा तृतीय क्रमांक आला.

    विद्यार्थ्यांच्या भाषणानंतर प्रमुख पाहुणे प्रा. बाळसाहेब राजूरकर यांनी सावित्रीबाईच्या कार्याची माहिती दिली. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी क्रांतीज्योती सावित्री बाईनी स्त्रीशिक्षणासाठी स्वतःचे आयुष्य समर्पित केले. स्त्रियांच्या जीवनातील अंधकार दूर केला. म्हणून त्यांचाच आदर्श घेऊन प्रत्येक घरात सावित्रीबाईचा विचार निर्मान व्हायला हवा असे प्रतिपादन प्रा. पाटील सरांनी केले.

    कार्यक्रमाचे संचलन विद्यार्थी करण खुटेमाटे यांनी केले तर आभार अधिक्षक मंगल तेलंग यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वस्तीगृहाचा सेवक कैलास वडस्कर यांनी सहकार्य केले.

    Photo