ठळक बातम्या

    लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे बहुआयामी सुयश.


    विदर्भ वार्ता|प्रतिनिधी

     वणी : शिक्षण प्रसारक मंडळ वणी संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी म्हणजे या तालुक्यातील उच्च शिक्षणाची सर्वात प्राचीन सुविधा. परिसरातील सर्वात मोठे महाविद्यालय असणाऱ्या या सुदूर आदिवासीबहुल भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असणाऱ्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रामध्ये आपले प्रतिनिधित्व निश्चित केले आहे. 

            विद्यार्थ्यांच्या विविध सुप्त गुणांना वाव देण्यासाठी शासनाच्या द्वारे आयोजित पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ येथे आयोजित राज्यस्तरीय उत्कर्ष या सामाजिक आणि सांस्कृतिक शिबिरासाठी महाविद्यालयाची विद्यार्थिनी ऋतुजा संतोष रामगिरवार हिची निवड झाली आहे. 

           आव्हान या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शिबिरासाठी दुष्यंत खामनकर, रोहित वाभिटकर तथा अल्फिया शेख या तिघांची निवड झाली असून, आपदा मित्र या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमातील शिबिरासाठी विशाल बोंडे, ओम ताटेवार, अल्फिया शेख आणि धम्मरुच्या दारुंडे यांची मुंबई घाटकोपर येथे होणाऱ्या शिबिरासाठी निवड झाली आहे. 

    अशा स्वरूपात विविध तीन शिबिरांसाठी महाविद्यालयातून आठ विद्यार्थ्यांची निवड होणे ही निश्चितच महाविद्यालयासाठी अभिमानाची गोष्ट आहे. 

            या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीसाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय मुकेवार यांच्यासह सर्व संचालक गणांनी, प्राचार्य डॉ प्रसाद खानझोडे यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या सर्व विद्यार्थ्यांचे आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. नीलिमा दवणे तथा डॉ. विकास जुनगरी यांचे अभिनंदन केले आहे.

    Photo