विदर्भ वार्ता|प्रतिनिधी
वडसा : वडसा तालुक्यातील कोकडी या लहानशा गावात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन व्यतीत करत, समाजसेवेलाच आयुष्य समर्पित करणारे प्रसिद्ध वैद्य श्री. प्रल्हाद कावळे यांचे आज दिं. ६/१/२०२६ रोज मंगळवार ला दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने वैद्यकीय सेवा क्षेत्रासह संपूर्ण समाजात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दम्यासारख्या गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या लाखो रुग्णांना त्यांनी निःशुल्क उपचार पद्धतीने नवसंजीवनी दिली. कोणताही मोबदला न घेता, केवळ मानवसेवेच्या भावनेतून त्यांनी आयुष्यभर रुग्णांची सेवा केली. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतही त्यांनी आपले कार्य कधीही थांबवले नाही, हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य होते.
परंतु आज काळानेच त्यांच्यावर झडप घातली असून, ही घटना अत्यंत हृदयद्रावक व दुर्दैवी असल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाने वैद्यकीय सेवा, समाजकार्य आणि मानवतेच्या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
त्यांचा अंत्यविधी दिं. ७/१/२०२६ रोज बुधवार ला ठिक सकाळी ११ वाजता गाढवी नदी कोकडी येथे पार पडेल.
रोहणकर परिवार तसेच महाराष्ट्र राज्य वरठी–परीट–धोबी समाज महासंघ (सर्व भाषिक) यांच्या वतीने वैद्य श्री. प्रल्हाद कावळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.
ईश्वर मृतात्म्यास चिरशांती प्रदान करो, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.
भैय्याजी रोहणकर
ज्येष्ठ मार्गदर्शक व प्रदेश उपाध्यक्ष
