ठळक बातम्या

    नृसिंह व्यायाम शाळेच्या प्रांगणात भव्य कबड्डीचे सामने उद्घाटन समारंभात महिला संघाचा होणार लक्षवेधी मुकाबला

     


    विदर्भ वार्ता|प्रतिनिधी

    वणी : नृसिंह व्यायाम शाळा द्वारा संचालित नृसिंह स्पोर्टिंग क्लब वणी तर्फे भव्य कबड्डी स्पर्धेचे दिं. १६ व १७ जाने.२०२६ ला आयोजन करण्यात आले आहे.

    या कार्यक्रमाचे उद्घाटक विजय चोरडिया जिल्हा संघटक शिवसेना (शिंदे), कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय खाडे संचालक कापूस उत्पादन पणन महासंघ महाराष्ट्र, तर प्रमुख अतिथी म्हणून कुणाल चोरडिया शिवसेना (शिंदे), प्रमोद इंगोले अध्यक्ष नृसिंह व्यायाम शाळा वणी,  प्रमोद निकुरे अध्यक्ष शिवाजी व्यायाम शाळा वणी, अंकुश बोढे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा, सैफुर रहमान नगर सेवक, अनिल आक्केवार सचिव केशव नागरी पतसंस्था वणी, प्रविण झाडे तालुका अध्यक्ष सरपंच संघटना वणी, विजय गाडगे संचालक संजय ऍटोमोबाईल्स वणी, शंकर झिलपे संचालक हाॅयवे किंग फॅमिली रेस्टॉरंट वाघदरा, गुलाम रसूल रंगरेज नगर सेवक वणी, जितेंद्र डाबरे संचालक नृसिंह मेडिकल वणी, संजय पावडे संचालक लक्ष्मी कृषी केंद्र वणी, सागर पोटे संचालक हाॅटेल मैफिल वणी,फारुख चिनी संचालक सेव्हन स्टार बेकरी वणी असुन होणाऱ्या कबड्डी स्पर्धेत ५६ किलो वजन गटात खेळविण्यात येणार आहे.  यांत प्रथम क्रमांक रु.२०००१ व कप, द्वितीय क्रमांक रु.१५००१ व कप,तृतीय क्रमांक रु.१०००१ व कप,चतुर्थ क्रमांक रु.७००१ व कप हि बक्षिसे ठेवण्यात आली आहे. तसेच वैयक्तिक बक्षिसे बेस्ट रेडर, बेस्ट डिफेंडर, बेस्ट ऑलराउंडर प्रत्येकी रु २१०० व कप मिळणार आहे. तसेच श्री गजानन स्पोर्ट्स तर्फे सेकंड राऊंड बेस्ट प्लेअर कप मिळणार आहे.

     स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष कुणाल ठोंबरे,  कार्याध्यक्ष गोविंदा मुजगेवार, उपाध्यक्ष अनिकेत वाढई, सचिव ब्रिजेश निंदेकर, कोषाध्यक्ष रोहित ठोंबरे व सदस्य परीश्रम घेत आहे. याचं स्पर्धेत महिला संघ भाग घेत आहे हे स्पर्धेचे वैशिष्ट्य; याचं स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात महिला संघाचे लक्ष्यवेधी सामने होणार आहे. ज्या मध्ये श्री नृसिंह स्पोर्टिंग क्लब वणी ची राष्ट्रस्तरीय (सब ज्युनिअर महिला) खेळाडू गौरी पिदुरकर व राज्यस्तरीय खेळाडू श्रद्धा देशमुख , जान्हवी ठाकरे या खेळाडूंचा समावेश असेल महिला संघाला आम्रपाली रेस्टॉरंट कडुन कप व पदकं देण्यात येणार आहे.

     स्पर्धेत भाग घेण्यासाठी कुणाल ठोंबरे  ९९२१८४२११७ ,ब्रिजेश निंदेकर ९०२८४९७९१९ वर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

    Photo