ठळक बातम्या

    स्वामी विवेकानंद व माँ जिजाऊ जयंतीच्या शुभमुहूर्तावर वणी नगराध्यक्ष , उपाध्यक्ष व नगरसेवक यांचा वणीत ऐतिहासिक पदग्रहण सोहळा संपन्न नव्या नेतृत्वाने नगरविकासाला नवी दिशा देण्याचा निर्धार

     


    विदर्भ वार्ता|प्रतिनिधी

    वणी : स्वामी विवेकानंद व माँ जिजाऊ यांच्या जयंतीच्या पावन शुभमुहूर्तावर, दि. १२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता वणी नगर परिषदेचा भव्य व ऐतिहासिक पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यात नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. विद्याताई खेमराज ऊर्फ सचिन आत्राम, उपाध्यक्ष राकेश बुगेवार तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला.

    नगर परिषद, वणी येथे आयोजित या सोहळ्याला लोकशाहीच्या विजयाचा साक्षीदार होण्यासाठी वणी शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. ढोल-ताशांच्या गजरात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

    यावेळी नगराध्यक्षा सौ. विद्याताई आत्राम यांनी पदग्रहणानंतर मनोगत व्यक्त करताना, “वणी शहराचा सर्वांगीण विकास, पारदर्शक प्रशासन, नागरिकाभिमुख निर्णय आणि मूलभूत सुविधांचे बळकटीकरण हेच आमचे प्रमुख ध्येय राहील. सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन शहराच्या प्रगतीसाठी एकसंघपणे काम करू,” असा ठाम निर्धार व्यक्त केला. उपाध्यक्ष राकेश बुगेवार यांनीही नगरपरिषदेच्या विकासासाठी सक्रिय व सकारात्मक भूमिका बजावण्याचे आश्वासन दिले.

    या ऐतिहासिक पदग्रहण सोहळ्यास पुढील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली—

    मा. ना. अशोक उईके, आदिवासी विकास मंत्री, महाराष्ट्र राज्य

    मा. संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी आमदार, वणी विधानसभा

    मा. ॲड. प्रफुल चौहान, अध्यक्ष, भाजपा यवतमाळ जिल्हा

    मा. नितीन भुतडा, जिल्हा समन्वयक, भाजपा

    मा. तारेंद्र बोर्डे, माजी नगराध्यक्ष तथा माजी जिल्हाध्यक्ष

    मा. ॲड. निलेश चौधरी भाजपा वणी शहर अध्यक्ष

    मा. दिनकर पावडे भाजपा राज्यपरीषद सदस्य

    मा. विजय पिदुरकर माजी जिल्हा परिषद सदस्य

    मा. संजय पिंपळशेंडे माजी पंचायत समिती सभापती

    मा. रवी बेलुरकर यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष

    मा. श्रीकांत पोटदुखे माजी नगरपरिषद उपाध्यक्ष 

    व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी

    या मान्यवरांनी आपल्या भाषणांतून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत वणी शहराच्या विकासासाठी समन्वयाने काम करण्याचा संदेश दिला.

    एकूणच, स्वामी विवेकानंद व माँ जिजाऊ यांच्या प्रेरणादायी जयंतीदिनी पार पडलेला हा पदग्रहण सोहळा वणीच्या राजकीय व प्रशासकीय इतिहासात नवा अध्याय ठरला, असे मत उपस्थित नागरिकांतून व्यक्त होत होते.







    पदग्रहण सोहळ्या नंतर नगराध्यक्ष यांच्या उपस्थितीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मा. माजी आमदार संजय रेड्डी बोदकुलवार यांनी माहिती दिली नगरपरिषदेचे उपाध्यक्ष पद हे अडीच वर्षा करीता मा. राकेश बुगेवार व  अडीच वर्षा करीता मा. लक्ष्मण उरकुडे राहतील. तर नगरपरिषद स्विकृत नगरसेवक सदस्य म्हणून मा. रवी बेलुरकर व मा. बलदेव खुंगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

    Photo