विदर्भ वार्ता|प्रतिनिधी
वणी : चैतन्य ज्येष्ठ नागरिक बहुउद्देशीय मंडळ, गणेशपूर व आदर्श ज्येष्ठ मंडळाचे संचालक, तसेच श्री बाजीराव महाराज वृद्धाश्रम, चिखलगाव येथे निस्वार्थ सेवेत कार्यरत संचालक, माजी स्वातंत्र्य सैनिक आणि स्वच्छता व वृक्षारोपणाच्या माध्यमातून समाजसेवेत सातत्याने योगदान देणारे नगर सेवा समितीचे सक्रिय सदस्य, गुरुवर्य कॉलनी, वणी येथील प्रेमळ, मनमिळाऊ व सर्वप्रिय व्यक्तिमत्त्व श्री. नामदेवराव जी फकरूजी शेलवडे साहेब यांचे आज दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ५.०० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
श्री. शेलवडे साहेबांनी आयुष्यभर समाजसेवा, ज्येष्ठ नागरिकांचे हित, स्वच्छता व पर्यावरण संवर्धन यासाठी आपले जीवन समर्पित केले. वृद्धाश्रमातील सेवाकार्य असो वा सार्वजनिक उपक्रम—प्रत्येक ठिकाणी त्यांनी निस्वार्थ भावनेने कार्य करून समाजात आदर्श निर्माण केला. त्यांच्या सौम्य स्वभावामुळे व सेवाभावी वृत्तीमुळे ते सर्वांच्या मनात विशेष स्थान निर्माण करून गेले.
त्यांच्या निधनाने सामाजिक, सेवाभावी व ज्येष्ठ नागरिकांच्या क्षेत्रात भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. शेलवडे कुटुंबीयांवर आलेल्या या दुःखात सर्व स्तरांतून शोक व्यक्त होत आहे.
ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो, व शोकाकुल कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना.
विदर्भ वार्ता |पत्र कडून
भावपूर्ण श्रद्धांजली.
