ठळक बातम्या

    वणी येथे प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमांनी साजरा

     

    विदर्भ वार्ता|प्रतिनिधी

    वणी : येथील शासकीय मैदानावर ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. येथील उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी आमदार संजय देरकर, माजी आमदार वामनराव कासावार , संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष विद्याताई आत्राम, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे, पोलिस निरीक्षक गोपाल उंबरकर, तहसीलदार निखिल धुळधर, गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार उपस्थित होते. 

         ध्वजारोहणानंतर पोलिस, गृहरक्षकदल आपदा निवारण दल, विविध शाळांचे राष्ट्रीय छात्र सेनेचे जवानांनी अतिथिना मानवंदना दिली. त्यानंतर निमंत्रित माजी सैनिकांचे गुलाब पुष्प देऊन अतिथिनी स्वागत केले. त्यानंतर कुष्ठरोग निवारण प्रतिज्ञा, बाल विवाह प्रतिबंध शपथ व तंबाखू मुक्त शपथ घेण्यात आली. यानंतर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांचा प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. 

    प्रत्यक्ष सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात देशभक्ती गीतावर सामूहिक कवायत करण्यात आली. या ठिकाणी शहरातील सर्व शाळांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. त्यात प्राथमिक गटात प्रथम बालविद्या मंदिर प्राथमिक शाळा, द्वितीय क्रमांक विवेकानंद विद्यालय वणी, तृतीय क्रमांक नगर परिषद शाळा क्रमांक ६ ने पटकावला. 

    उच्च प्राथमिक शाळा गटात प्रथम क्रमांक नगर परिषद शाळा क्रमांक ८, द्वितीय क्रमांक नगर परिषद शाळा क्रमांक ७, तृतीय क्रमांक सक्षम इंग्लिश मिडीयम स्कूल वणी यांनी मिळविला. माध्यमिक शाळा गटात प्रथम क्रमांक विवेकानंद विद्यालय वणी, द्वितीय क्रमांक स्वर्णलीला इंटर नॅशनल स्कूल, तृतीय क्रमांक जनता विद्यालय वणी यांनी मिळविला. पथसंचलनामध्ये प्रथम क्रमांक एस पी एम हायस्कूल चे राष्ट्रीय छात्र सेना दलाने  तर द्वितीय क्रमांक जनता विद्यालय ने पटकावला. 

    सांस्कृतिक कार्यक्रमाचे परीक्षण अभिलाष राजुरकर, जयंत कुचनकर , अमोल बावणे यांनी केले. पथसंचलनाचे परीक्षण गजानन मोहितकर व महेश कोहळे या माजी सैनिकांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नायब तहसीलदार विवेक पांडे व गजानन कासावार यांनी केले.




    Photo