ठळक बातम्या

    सिध्दार्थ वसतिगृह वणी येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न.

     


    विदर्भ वार्ता|प्रतिनिधी

    वणीः- सिद्धार्थ वस्तीगृह वणी येथे ७७ वा गणराज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

    या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा. पुरुषोत्तम पाटील हे उपस्थित होते.तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. एस.एस.सोनारखन, बाळासाहेब राजुरकर नवनाथ नगराळे, ॲड. दौलतराव वानखेडे, जगदीश भगत, कांबळे सर हे उपस्थित होते.

    सर्वप्रथम भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करून, दिपप्रज्वलन करण्यात आले. प्रजासत्ताक दिना बद्दल वसतिगृहातील विद्यार्थ्यां करीता भाषण स्पर्धेचे व गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. भाषण स्पर्धेत प्रथम क्रमांक विठ्ठल पारखी तर द्वितीय क्रमांक मुकेश भिमराव कुमरे यांचा आला. गायन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आदित्य आसुटकर तर द्वितीय क्रमांक, ओम राजु कोल्हेकार यांनी पटकावला.

    त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना संविधानाची निर्मिती कशी झाली व संविधानातील मुल्याची माहिती दिली.

    तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. पुरुषोत्तम पाटील यांनी २६ जानेवारी १९५० रोजी आपल्या देशाने संविधानाच्या बळावर लोकशाही, स्वातंत्र्य आणि समतेचा नवा अध्याय सुरू केला. मात्र आज या स्वातंत्र्याचे आणि संविधानीक हक्काचे रक्षण करण्याचे मोठे आव्हान समोर उभे आहे. असे विचार व्यक्त केले.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिक्षक मंगल तेलंग यांनी केले तर संचालन विद्यार्थी करण खुटेमाटे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मंगल तेलंग यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेवक कैलास वडसकर यांनी सहकार्य केले.


    Photo