ठळक बातम्या

    नृसिंह व्यायाम शाळा वणी येथे भव्य कबड्डी स्पर्धेचा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न उद्घाटनपर झालेल्या थरारक सामन्यात नृसिंह स्पोर्टिंग क्लब संघाचे दमदार प्रदर्शन

     


    विदर्भ वार्ता|प्रतिनिधी

    वणी : नृसिंह व्यायाम शाळा प्रणित नृसिंह स्पोर्टिंग क्लब वणी येथे दि.१६ जानेवारीपासून भव्य कबड्डी स्पर्धेला उत्साहात प्रारंभ झाला.

     या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला.

     यावेळी उद्घाटक म्हणून शिवसेनेचे जिल्हा संघटक विजय बाबू चोरडिया तर अध्यक्ष म्हणून शिवाजी व्यायाम शाळेचे मा.अध्यक्ष प्रमोद निकुरे तर प्रमुख अतिथी म्हणून प्रभाग क्रमांक १४ आणि १३ चे नवनिर्वाचित नगरसेवक सैफुर रहेमान, शंकर झिलपे, गुलाम रसुल रंगरेज,केशव नागरी पतसंस्थेचे सचिव अनिल आक्केवार, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रविण झाडे, संजय पावडे, श्री नृसिंह स्पोर्टिंग क्लब चे अध्यक्ष कुणाल ठोंबरे, उपाध्यक्ष अनिकेत वाढई, सचिव ब्रिजेश निंदेकर,दादा राऊत, सुधाकर काळे, रमेश उगले, पुरुषोत्तम आक्केवार, परशुराम पोटे, विशाल ठोंबरे, धर्मेंद्र काकडे,  क्रीडाप्रेमी, खेळाडू आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वातावरण खेळभावनेने भारले गेले होते.

    उद्घाटनप्रसंगी विजय चोरडिया यांनी कबड्डी हा ग्रामीण भागातील पारंपरिक व ताकदीचा मैदानी खेळ असल्याचे सांगत युवकांनी खेळाकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे, असे आवाहन केले. तसेच खेळातून शिस्त, संघभावना व जिद्द निर्माण होते, असे मत त्यांनी व्यक्त केले.तसेच प्रवीण झाडे  अनिल आक्केवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

    उद्घाटनपर सामन्यात नृसिंह स्पोर्टिंग क्लब संघाचे दमदार प्रदर्शन

    उद्घाटनपर झालेल्या धरारक सामन्यात नृसिंह स्पोर्टिंग क्लब संघाने दमदार खेळाचे प्रदर्शन करत विजय मिळवला. सामन्यात नृसिंह स्पोर्टिंग क्लब आणि कोंढा या दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. मात्र अखेर नृसिंह स्पोर्टिंग क्लबने उत्कृष्ट आक्रमण व भक्कम बचावाच्या जोरावर सामना आपल्या नावावर केला.

    १६ जानेवारीपासून सुरू झालेल्या या कबड्डी स्पर्धेत विविध संघ सहभागी होत असून आगामी सामने अधिक रंगतदार ठरण्याची अपेक्षा क्रीडाप्रेमींमधून व्यक्त होत आहे. सामने यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सदस्य परिश्रम घेत आहेत.



    Photo