विदर्भ वार्ता|प्रतिनिधी
वणी : मानकी ग्राम पंचायत कार्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात दोन्ही थोर व्यक्तिमत्त्वांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्या सौ इंदिरा परशुराम पोटे, पोलिस पाटील सौ मिनाक्षी सुजीत मिलमिले, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष परशुराम पोटे, अंगणवाडी सेविका सौ बेबिताई मालेकर, प्रदिप मालेकर, अमर खुसपुरे, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.
