ठळक बातम्या

    चिखलगाव येथे भव्य नेत्र तपासणी व मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद सरपंच रुपाली सुनील कातकडे व उपसरपंच सुनील कातकडे यांच्या पुढाकारातून शिबिराचे आयोजन

     


    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

    वणी : वणी शहरालगत असलेल्या चिखलगाव येथे आयोजित भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

     शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व स्व. केशवराव कातकडे बहुउद्देशीय शिक्षण संस्था, चिखलगाव या संस्थेच्या सामाजिक दायित्वातून चिखलगावच्या सरपंच रुपाली सुनील कातकडे व उपसरपंच सुनील कातकडे यांच्या पुढाकाराने या शिबिराचे आयोजन शनिवारी 31 जानेवारी ला करण्यात आले होते.

    जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, चिखलगाव येथे सकाळी 10 वाजल्यापासून आरोग्य शिबिरास सुरुवात झाली. या शिबिराचे उद्घाटन आमदार संजय देरकर यांच्या हस्ते पार पडले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार वामनराव कासावार उपस्थित होते. कार्यक्रमास चिखलगावच्या सरपंच रुपाली कातकडे, उप सरपंच सुनील कातकडे, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय निखाडे, शरद ठाकरे, डॉ. महेंद्र लोढा, गणपत लेडांगे, सुधीर थेरे, अजिंक्य शेंडे, रामचंद्र वाभिटकर यांचेसह विविध क्षेत्रातील मान्यवर, तज्ज्ञ डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    शिबिरात नागरिकांची सखोल नेत्र तपासणी करण्यात आली. मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र रुग्णांची निवड करून त्यांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले. यासोबतच रक्तदाब, मधुमेह व सर्वसाधारण आरोग्य तपासणीसह आवश्यक वैद्यकीय सल्ला देण्यात आला. अनुभवी डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्णांची काळजीपूर्वक तपासणी केली.

    महात्मे नेत्र पेठी, नागपूर, लोढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, वणी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, राजूर यांच्या संयुक्त सहकार्याने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेले हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरले. शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित नागरिकांनी आयोजक संस्था, मान्यवर, डॉक्टर व सहकार्य करणाऱ्या सर्व घटकांचे मनःपूर्वक आभार मानले.



    Photo