विदर्भवार्ता|प्रतिनिधी
वणी : झरी (जामणी) तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खरबडा व बिरसापेठ यांच्या संयुक्त विद्यमाने एकत्रित वार्षिक स्नेहसंमेलन शनिवार, दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १२.०० वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिरसापेठ व खरबडा येथे उत्साहात पार पडले.
या स्नेहसंमेलनाचे आयोजन मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. कार्यक्रमाला दोन्ही शाळांच्या शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पालकवर्ग, ग्रामस्थ तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक नृत्ये, गीतगायन, नाट्यप्रयोग व विविध कलागुणांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करत शिक्षक व मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षकवृंद व पालकांचे सहकार्य लाभले.एकूणच हे एकत्रित वार्षिक स्नेहसंमेलन आनंदी वातावरणात व शिस्तबद्ध पद्धतीने यशस्वीरीत्या संपन्न झाले.




