विदर्भवार्ता|प्रतिनिधी
वणी : शिक्षण प्रसारक मंडळ वणी द्वारा संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाद्वारे विद्यार्थ्यांमधील क्रीडा कौशल्य,समूहभावना तथा खेळाडू वृत्तीच्या विकासासाठी ,वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरिता क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन आपल्या शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष श्री विजुभाऊ मुकेवार यांच्या शुभ हस्ते मंडळाच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयाच्या प्रांगणामध्ये सोमवार दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९-३० वाजता संपन्न होईल.
दिनांक १८ फेब्रुवारी पर्यंत चालणाऱ्या क्रीडा स्पर्धांमध्ये क्रिकेट, कबड्डी, व्हॉलीबॉल, रस्सीखेच, लंगडी, बॅडमिंटन, चेस, कॅरम, रनिंग, गोळा फेक, टेबल टेनिस इत्यादी क्रीडा स्पर्धांच्या सोबतच दोरी वरील उड्या, एका पायावर धावणे,लिंबु चमचा ,पासिंग बॉल ,संगीत खुर्ची इत्यादी मनोरंजक क्रीडा प्रकारांचे देखील मुले आणि मुली अशा दोन्ही गटांमध्ये आयोजन करण्यात आलेले आहे.
महाविद्यालयातील सर्व विद्या शाखांच्या विद्यार्थ्यांनी अधिकाधिक संख्येत या स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे आणि शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवीत स्पर्धांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रसाद खानझोडे तथा
शारीरिक क्रीडा संचालक प्रा. उमेश व्यास यांच्यावतीने करण्यात येत आहे.

