ठळक बातम्या

    मा. हंसराज भैया अहिर यांच्या संकल्पनेतून नांदेपेरा येथे १२ फेब्रुवारीला मोफत फिरते चिकित्सा शिबीर

     


    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

    वणी नांदेपेरा : माजी केंद्रीय मंत्री मा. हंसराज भैया अहिर यांच्या संकल्पनेतून नांदेपेरा येथे मोफत फिरते चिकित्सा शिबीर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर गुरुवार, दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता सुरू होणार आहे.

    ग्रामीण व गरजू नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, शिबिरात सर्वसाधारण तपासणी, आजारांचे निदान तसेच आवश्यक मार्गदर्शन व औषधोपचार करण्यात येणार आहेत.

    या शिबिराचे आयोजन श्री. पवन राम एकरे, भारतीय जनता पार्टी यवतमाळ जिल्हा अध्यक्ष, ओबीसी आघाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे. नांदेपेरा व परिसरातील नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



    Photo