विदर्भवार्ता|प्रतिनिधी
वणी : न्यूज मिडिया पत्रकार असोसिएशनची बैठक साप्ताहिक मुक्त ललकार कार्यालयात उत्साहात पार पडली. या बैठकीत विद्यमान कार्यकारिणीचे कामकाज समाधानकारक व सुरळीत सुरू असल्याबद्दल सदस्यांनी समाधान व्यक्त केले.
बैठकीदरम्यान सर्वानुमते जुन्याच कार्यकारिणीची फेरनिवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार अध्यक्षपदी दिपक छाजेड, उपाध्यक्षपदी शेख इक्बाल तर सचिवपदी परशुराम पोटे यांची फेरनिवड करण्यात आली.
या बैठकीस असोसिएशनचे माजी अध्यक्ष आसिफ शेख, महादेव दोडके, विशाल ठोंबरे, प्रविण शर्मा यांच्यासह दिपक छाजेड, परशुराम पोटे, इक्बाल शेख व इतर सदस्य उपस्थित होते. नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे उपस्थित सदस्यांनी अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.


