विदर्भवार्ता|प्रतिनिधी
वणी-येनक : मोझरी येथून निघालेली राष्ट्रसंतांच्या प्रबोधनात्मक विचारांची वारी आज मंगळवार दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता येनक (ता. वणी) येथे दाखल झाली. वारीचे येनक येथील ग्रामस्थांनी फुलांच्या वर्षावात व जल्लोषात स्वागत केले.
वारीच्या आगमनानंतर आयोजित राष्ट्रसंत प्रबोधनात्मक कार्यक्रमात राष्ट्रसंतांच्या विचारांचा समाजजीवनावर होणारा प्रभाव, नैतिक मूल्ये, सामाजिक एकता, व्यसनमुक्ती व ग्रामविकास यावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाला येनक ग्रामवासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या वारीमुळे ग्रामस्थांमध्ये सामाजिक सलोखा, सकारात्मक विचारसरणी व राष्ट्रसंतांच्या विचारांचे महत्व अधिक दृढ झाले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी, विविध सामाजिक संघटना व तरुण मंडळींनी विशेष सहकार्य केले.



