ठळक बातम्या

    चंद्रपूर महानगरपालिकेवर महापौरपदी भाजपाच्या संगीता खांडेकर यांची निवड.

     


    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

    चंद्रपूर:चंद्रपूर महानगरपालिकेत आज राजकीय नाट्याने कळस गाठला असून काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला आहे. भाजपाच्या संगीता खांडेकर यांची महापौरपदी निवड होताच शहराच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे चंद्रपूरमध्ये काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष असतानाही अंतर्गत कलह आणि नेत्यांमधील उभी फूट काँग्रेसच्या अंगलट आली.

    महापौर पदाच्या निवडणुकीत संगीता खांडेकर यांना ३२ मते, तर काँग्रेसच्या उमेदवाराला ३१ मते मिळाली. अवघ्या एका मताने चंद्रपूरच्या सत्तेची गणिते पूर्णपणे उलथापालथ झाली. ६६ सदस्यांच्या महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी ३४ संख्याबळ आवश्यक असताना, वंचित बहुजन आघाडी आणि AIMIM चे नगरसेवक मतदानावेळी गैरहजर राहिल्याने बहुमताचा आकडा खाली आला.

    याच संधीचा फायदा घेत भाजपने ठाकरे गटाच्या पाठिंब्याने निर्णायक डाव खेळत सत्ता आपल्या बाजूने वळवली. काँग्रेसच्या अंतर्गत वादाचा फटका थेट सत्तेवर बसला असून, भाजपने चंद्रपूर महानगरपालिकेवर भगवा फडकावला आहे.


    संगीता खांडेकर यांच्या निवडीने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून, तर काँग्रेस गोटात निराशेचे वातावरण आहे. एका मताने हरलेली सत्ता आणि गैरहजेरीमुळे बदललेले राजकीय समीकरण — चंद्रपूरचा हा सत्तानाट्यपूर्ण अध्याय सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.



    Photo