ठळक बातम्या

    यवतमाळ रोड जवळील गजानन महाराज मंदीरात प्रकट दिन महोत्सव विविध कार्यक्रमानी संपन्न झाला

     


    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

    वणीसंत गजानन महाराज चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने  यवतमाळ रोड जवळील संत गजानन महाराज मंदिरात गजानन महाराज प्रकट दिन विविध कार्यक्रमानी संपन्न झाला.यानिमीत्ताने ह.भ.प.विनायकराब बोबडे महाराज यांचे काय वाणू मी या संतांचे उपकार या विषयावर तर  डाॅ.गजानन अघळते यांचे गण गण गणात बोते आणि आध्यात्मिक वाटचाल या विषयावर प्रवचन झाले.प्रकट दिनानिमित्त भव्य पालखी मीरवणूक काढण्यात आली.

    ही पालखी मीरवणूक गुरुवर्य काॅलणी, जिल्हा परिषद काॅलणी, विनायक नगर या भागात फिरुन या भागातील अनेक नागरिकांनी गजानन महाराज यांचे दर्शन घेतले.ही पालखी जगन्नाथ बाबा मठ,जैताई मंदीर व साईबाबा मंदिरात  दर्शनासाठी ठेवण्यात आली त्यानंतर गजानन महाराज मंदिरात जाऊन आरती व महाप्रसाद वाटप करण्यात आला‌.सायंकाळी स्वरसरिता म्यूझिकल ग्रुप चंद्रपूर च्या वतीने भक्तीगीतांचा कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमास मा.संजयभाऊ देरकर आमदार वणी विधानसभा क्षेत्र,मा.विद्याताई आत्राम नगराध्यक्ष,श्री.राकेश बुग्गेवार उपाध्यक्ष तथा अनेक सदस्य नगर परिषद वणी व अनेक पदाधिकारी व अधिकारी यांनी गजानन महाराज यांचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.


    कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संत गजानन महाराज चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने लक्ष्मण इद्दे,अशोक खामनकर, राजेश खूसपूरे,विजय निंबूळकर,सुरेश काकडे,डाॅ.ऊत्तम पावडे,प्रदीप लोनबडे,अनिल खोकले,सुनिल वरारकर,गजानन रोगे, रविंद्र ठावरी, दिलीप खामनकर,प्रभाकर गोखरे,सदानंद गौरकार,किशोर ठक,दत्तु आस्कर,वानखेडे साहेब.

    वर्षा खूसपूरे..सचिव, लता थेरे, इंदिरा खूसपूरे, सुनंदा इद्दे,कल्पना निंबूळकर, ज्योत्स्ना खोकले,शुभांगी ठावरी, सुनिता काकडे, सुनिता किनाके,चंदकला पिदुरकर यांनी सहकार्य केले.



    Photo