ठळक बातम्या

    राष्ट्रसंतांच्या विचारांची ‘वारी प्रबोधनाची’ येनकात दाखल; १० फेब्रुवारीला भव्य स्वागत

     


    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

    वणी -येनक : ग्रामसमृद्धीचा संदेश देणारी आणि राष्ट्रसंतांच्या विचारांचा जागर करणारी ‘वारी प्रबोधनाची’ येनक गावात येत्या मंगळवार दिनांक १० फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता दाखल होत आहे.

    या वारीचे आगमन हनुमान मंदिर, येनक येथे होणार असून, येनक गावकरी मंडळींच्या वतीने पारंपरिक व उत्स्फूर्त स्वरूपात स्वागत करण्यात येणार आहे. समाजप्रबोधन, नैतिक मूल्ये, ग्रामविकास व राष्ट्रसंतांच्या विचारांचे बीज पेरणारी ही वारी ग्रामविकासाच्या दिशेने प्रेरणादायी ठरणार आहे.

    या ऐतिहासिक व प्रेरणादायी क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सर्व येनक गावकरी मंडळींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.



    Photo