ठळक बातम्या

    विद्यार्थ्यांना आपले सर्वोत्कृष्ट देण्यासाठी शिक्षकांनी अद्ययावत असावे. विद्याताई आत्राम

     


    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

    वणी : २१ वे शतक हे स्पर्ध्ये आहे. येथे क्षणाक्षणाला ज्ञानाचा प्रस्फोट होत आहे. अशा स्थितीत नगर परिषद शाळामध्ये शिकणारी मुले या स्पर्धेत कुठेही मागे राहू नये यासाठी शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना तुमच्या कडे असलेले सर्वोत्तम देण्यासाठी तुम्ही स्वतः  अद्ययावत असले पाहिजे असे प्रतिपादन वणी नगर परिषदेच्या अध्यक्षा विद्याताई आत्राम यांनी केले. त्या नगर परिषद शिक्षण विभागाच्या वतीने नगर परिषद शाळा क्रमांक ७ मध्ये आयोजित शिक्षण परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होत्या. 

           या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण सभापती सोनाली निमकर या होत्या. प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर चांदेकर हे होते. प्रास्ताविकातून प्रशासन अधिकारी गजानन कासावार यांनी या शिक्षण परिषदेच्या आयोजनाचा उद्देश सांगून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून शिक्षकांकडून कोणत्या अपेक्षा आहेत याचे विवेचन केले. अध्यक्षीय भाषणात शिक्षण सभापती सोनाली निमकर यांनी शिक्षण सभापती या नात्याने शिक्षकांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन देऊन त्यांच्या अपेक्षा व्यक्त केल्या. 

           यानंतर सर्वप्रथम सुलभक म्हणून शाळा क्र. ७ च्या शिक्षिका शुभांगी वैद्य यांनी निपुण महाराष्ट्र अंतर्गत लीडर माता पालक हा विषय मांडला. दिगंबर ठाकरे यांनी मूल्यसंवर्धन हा विषय मांडला. शाळा क्र ८ चे अविनाश तुंबडे यांनी डॉक्टर जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान अध्ययन समृद्धी या विषयी मार्गदर्शन करून या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे ऑनलाईन नोंदणी कशी करायची हे प्रात्यक्षिक असं उपस्थित शिक्षकांना समजावून सांगितले. त्यासोबत अध्ययन स्तर नोंदणी बाबत आढावा घेऊन मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर शिक्षकांना प्रत्यक्ष अध्ययन अध्यापन करतांना येणाऱ्या अडचणीवर चर्चा करून समाधान करण्यात आले. 

          या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्र समन्वयक चंदू परेकर यांनी केले. आभार प्रदर्शन विजय चव्हाण यांनी केले. या शिक्षण परिषदेला सर्व मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.




    Photo