ठळक बातम्या

    परमडोह नगरीत राष्ट्रसंतांच्या विचारांची वारी; मोझरीहून येणाऱ्या वारीच्या स्वागतासाठी गाव सज्ज


    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

     वणी-परमडोह : राष्ट्रसंतांच्या प्रबोधनात्मक विचारांची वारी दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता मोझरी येथून परमडोह येथे दाखल होत आहे. या वारीचे परमडोह गावात उत्स्फूर्त स्वागत करण्यात येणार असून, यानिमित्ताने गावात चैतन्यपूर्ण व भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

    मोझरी येथून येणाऱ्या या वारीचे परमडोह गावात स्वागत केल्यानंतर विविध विचारवंतांकडून राष्ट्रसंतांच्या विचारांचे महत्त्व, योग्य दानधर्म व समाजप्रबोधनाचे संदेश उपस्थितांना दिले जाणार आहेत. या वारीच्या निमित्ताने परमडोह येथे मोठ्या प्रमाणावर भाविक व नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता असून, त्यामुळे परमडोहमध्ये संपूर्ण मोझरी उतरणार असल्याचे चित्र आहे.

    या प्रबोधन वारीसाठी परमडोह गावकरी उत्सुकतेने वाट पाहत असून, आजूबाजूच्या गावांतील नागरिक देखील राष्ट्रसंतांचे विचार ऐकण्यासाठी परमडोहमध्ये दाखल होणार आहेत. विशेष म्हणजे, मोझरी येथे राष्ट्रसंतांचे विचार ऐकण्यासाठी जाणारे नामवंत दिग्गज प्रबोधनकार हे याच दिवशी परमडोह नगरीतील संत नारायण बाबा मंदिरात दाखल होणार आहेत.

    तरी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी आजूबाजूच्या सर्व ग्रामस्थ व नगरवासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून राष्ट्रसंतांच्या प्रबोधनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



    Photo