ठळक बातम्या

    लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे रा.से.यो.शिबीर संपन्न


    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

     वणी :  संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित, शिक्षण प्रसारक मंडळ संचालित, लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी चे रा.से.यो विशेष श्रम संस्कार शिबीर दत्तक ग्राम वांजरी येथे विविध उपक्रम घेवून नुकतेच संपन्न झाले.  

            शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय मुकेवार यांच्या अध्यक्षतेखाली शिबीराचे व साप्ताहिक ग्रंथालयाचे  उद्घघाटन संपन्न झाले. शाश्वत विकासासाठी पाणलोट व्यवस्थापन आणि पडिक जमीन विकास या उपक्रमावर आधारित शिबिर वैशिष्ट्यपूर्ण ठरले. 

           या शिबिरामध्ये घनकचऱ्याचे व्यवस्थापन, स्मशानभूमी स्वच्छता, स्मशानभूमी सौंदर्यकरण, घर घर संविधान, जलप्रकल्प, वृक्षारोपण, इको ब्रिक्स वर्कशॉप, माझा कचरा माझी जबाबदारी, अंधश्रद्धा निर्मूलन, मतदान जनजागृती, महिला सक्षमीकरण, बालविवाह मुक्त भारत अशा विविध उपक्रमांनी लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे हे शिबिर वांजरी या गावकऱ्यांसाठी संस्मरणीय ठरले .

     राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराचे एक वैशिष्ट्यपूर्ण सत्र म्हणजे बौद्धिक सत्र.यामध्ये

    पंडित दीनदयाल उपाध्याय यांची विचारधारा व आजचा युवा वर्ग या विषयावर प्राचार्य डॉ.प्रसाद खानझोडे,राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी जीवनात महत्त्वया विषयावर अमर कातोरे यांनी  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.  यावेळी अध्यक्ष म्हणून सौ.साधना डोंगे तर सौ.अनुसया खारकर यांची विशेष उपस्थिती होती .  

             व्यक्तिमत्व विकासाठी शिक्षण या विषयावर डॉ . स्वानंद पुंड यांनी डॉ. संघदिप उके यांच्या अध्यक्षतेखाली तर  ईको ब्रिक्स या विषयवर प्रा. अंजली  आत्राम यांनी श्री मुकेश डोनेकर यांच्या अध्यक्षतेखाली विचार प्रगट केले यावेळी  प्रमुख अतिथी म्हणून प्रा. गजानन अघळते आणि प्रा. भट उपस्थित होते.  

           स्वयंप्रतिकारक रोगाशी लढतांना या विषयावर डॉ.सुवर्णा चरपे यांनी आकाश काकडे यांच्या अध्यक्षतेत, महेश तेलतुबंडे ग्रा. प.सदस्य यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन केले याप्रसंगी गांवकरी आणि विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली 

         जलसंधारण : चला जगू या  माणूसकीला या विषयावर श्री रूपेश रेगे यांनी विकास जेनेकर यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शन केले. 

            अशा विविध विषयांच्या द्वारे विद्यार्थ्यांचा बौद्धिक, शारीरिक, मानसिक  सर्वांगीण विकास साधणाऱ्या या शिबिरात सांस्कृतिक कार्यक्रमाची सुद्धा पर्वणी होती . 

           सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये नकलाकार डॉ. दिलीप अलोने यांनी गावकरी आणि विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमातून प्रबोधन केले . विविध विषयांवर आधारित पथनाट्य, हास्य नाटिका आणि नृत्याच्या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी, महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभागाने आणि जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वांजरी यांनी शिबिरात दररोज वांजरीकरांसाठी सातही दिवस उत्साहाचे वातावरण निर्माण केले . 

          राष्ट्रीय सेवा योजनेच्या समारोपीय कार्यक्रमा मध्ये . अध्यक्ष शि.प्र.मं चे अध्यक्ष  विजयजी मुकेवार यांनी राष्ट्रीय सेवा योजना हे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाचे महत्त्वपूर्ण माध्यम आहे असे प्रतिपादन केले.  यावेळी जे विद्यार्थी राज्य व राष्ट्रीय शिबीरात सहभागी झाले त्यांचा  सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला.

          प्रास्ताविकात कार्यक्रम अधिकारी डॉ.निलीमा दवणे यांनी वर्षभर रा.से.यो.ने घेतलेल्या उपक्रमाची माहिती दिली .रा.से.यो.शिबीर  उत्तम नागरीक घडविण्याचे माध्यम असून मानवाला  मानवतेशी जोडणारा पुल म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना होय असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी केले. वांजरी च्या सरपंच अरुणाताई जेनेकर, जि प शाळा चे मुख्याध्यापक हेमंत तिमांडे , गावाचे प्रतिष्ठित नागरिक विकास जेनेकर अशा विविध मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. 

           या शिबीराला विद्यापीठ समन्वयक डॉ.निलेश कडू यांनी भेट दिली व उत्तम शिबीर म्हणून गौरविले.शिबीरात रँली ,आरोग्य शिबीर,महिला मेळावा, शोषखड्डे ,स्वच्छता अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव अशोकरावजी सोनटक्के आणि वांजरी गावचा पोलीस पाटील संगीताताई तेलतुंबडे उपस्थित होत्या .

    संचालन कार्यक्रम अधिकारी  डॉ. विकास जुनगरी यांनी केले  तर आभार डॉ. नीलिमा दवणे यांनी मानले. वांजरीचे उपसरपंच अमोलजी कुंभारे यांचे या शिबिरासाठी विशेष  सहकार्य लाभले.



    Photo