ठळक बातम्या

    वरझडीतील युवाशक्तीचा ‘कमळ’कडे कल; बोदकुलवारांच्या नेतृत्वावर ठेवला विश्वास

     


    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

    वणी : वणी तालुक्यातील वरझडी येथील युवकांनी राजकीय क्षेत्रात सक्रिय पाऊल टाकत भारतीय जनता पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला. वणी विधानसभेचे लोकप्रिय माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुलवार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत हा पक्षप्रवेश सोहळा दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहात पार पडला.

    या पक्षप्रवेशासाठी मा. दिनकर पावडे, दिनेश चांदेकर (उपसरपंच), पुरुषोत्तम वाटगुरे, नेताजी भोयर, नितीन वासेकर व मारोती तलांडे यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक तरुणांनी भारतीय जनता पक्षाची विचारधारा स्वीकारत सक्रिय राजकारणात प्रवेश केला.

    भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्या युवकांमध्ये महेश मेश्राम, महेश कुकुडे, विशाल लोनवले, अथर्व गाऊत्रे, धनराज शेंडे, ओम नलांडे, अभिषेक मेश्राम, महादेव बोडाळकर, कृष्णा चांदेकर, साहिल निकोडे, पुष्पक लोनबले, गणेश धुर्वे, प्रफुल चांदेकर, युगांत साऊरकर, निहाल तलांडे व कुणाल चांदेकर यांचा समावेश आहे.

    यावेळी बोलताना माजी आमदार बोदकुलवार यांनी युवकांचे स्वागत करत, “भारतीय जनता पक्ष हा विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवणारा पक्ष आहे. युवकांच्या ऊर्जेमुळे पक्ष संघटन अधिक बळकट होईल. वरझडीसह संपूर्ण वणी तालुक्यात विकासकामांना गती देण्यासाठी आपण सर्वजण एकत्रितपणे काम करू,” असा विश्वास व्यक्त केला.

    पक्षप्रवेशामुळे वरझडी परिसरात राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झाले असून, आगामी काळात युवकांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे बोलले जात आहे. स्थानिक स्तरावर या प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू असून, युवकांच्या या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत होत आहे.




    Photo