ठळक बातम्या

    राजभाषा मराठी गौरव दिन उत्साहात साजरा

     


    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

    वणी:  येथील वणी पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे राजभाषा मराठी गौरव दिन म्हणजेच कुसुमाग्रज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेचे प्राचार्य श्री बाविस्कर सर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन शाळेची विद्यार्थिनी कु. तनिषा चकेरे हिने केले. विद्यार्थ्यांनी पोवाडा, समूहगीत, नृत्य, प्रश्नमंजुषा व भाषणातून मराठी भाषेचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री बाविस्कर सर यांनी आपल्या भाषणातून वि. वा. शिरवाडकर यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकला तसेच मराठी भाषेची थोरवी बखाण केली व मातृभाषेचे दैनंदिन जीवनातील महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. हा कार्यक्रम सौ. अनुपाली खोब्रागडे मॅडम, सौ. संतोषी ताजने मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यार्थिनी अनुष्का ताजने हिने केले. 

     कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता  शाळेचे इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.























    Photo