ठळक बातम्या

    लाखांदूरचे फागोजी कडीखाये यांची ‘भारत गौरव पुरस्कार’ साठी निवड

     


    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

    भंडारा : लाखांदूर शहरातील फागोजी गोदरूजी कडीखाये यांची प्रेरणा फाउंडेशनच्या वतीने दिल्या जाणाऱ्या ‘भारत गौरव पुरस्कार’ासाठी निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, पत्रकारिता, साहित्य आणि समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येतो.

    समाजासाठी अहोरात्र झटत विविध उपक्रम राबविणाऱ्या फागोजी कडीखाये यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना दि. २२ मार्च २०२६ रोजी बदलापूर (मुंबई) येथे होणाऱ्या सोहळ्यात हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

    प्रेरणा फाउंडेशनतर्फे बेलवली, बदलापूर (जि. ठाणे) येथे आयोजित कार्यक्रमात संस्थेच्या संस्थापिका सौ. प्रेरणाताई वैभवजी कुलकर्णी तसेच सर्व समिती सदस्यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

    या निवडीचे श्रेय साहित्यिक प्रा. रजनीताई लुंगसे (शिरपूर) तसेच श्री संत गाडगेबाबा जनकल्याण उत्सव समिती, लाखांदूर, जि. भंडारा यांना देण्यात आले आहे.

    फागोजी कडीखाये यांच्या निवडीमुळे लाखांदूर शहरासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

    💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐


    युवकांच्या मनात अध्यात्माची ज्योत प्रज्वलित करणारे सन्मानीय फागोजी कडीखाये गुरुजी...

    आदरणीय फागोजी कडीखाये मोठे बाबाजी तसेच स्व. लक्ष्मी फागोजी कडीखाये मोठी माई, आज आईची खूप आठवण येत आहे. बाबांना पुरस्कार मिळाला, पण लक्ष्मी आईचंही खूप मोठं कार्य आहे. त्यांनी कुटुंब सांभाळलं, म्हणून बाबांना समाजसेवा करण्यासाठी वेळ देता आला. आज शब्द अपुरे पडत आहेत... मन कृतज्ञतेने आणि अभिमानाने दाटून आले आहे. माझ्या आयुष्यात आध्यात्माची गोडी, भगवी टोपीचा अभिमान आणि संत गाडगे बाबा यांच्या विचारांची पवित्र बीजे तुम्ही माझ्या कोवळ्या वयातच माझ्या हृदयात पेरलीत. त्या संस्कारांचे ऋण मी जन्मभर फेडू शकणार नाही. प्रातः काळी ४ वाजता उठून काकड आरतीसाठी मंदिरात जाण्याचे ते दिवस अजूनही मनात जिवंत आहेत. अंधारातून प्रकाशाकडे नेणारे ते क्षण, भक्तीभावाने भारलेले वातावरण आणि तुमचा हात धरून चालण्याची ती सुरक्षित भावना हे सगळं माझ्या आयुष्याचा पाया बनलं. त्या प्रत्येक आरतीतून शिस्त शिकली, सेवाभाव अंगीकारला आणि समाजासाठी जगण्याची प्रेरणा मिळाली. माझा सहकारी मित्र नितीन पारधी सर आणि मी आम्ही दोघेही नित्यनेमाने त्या आरतीस उपस्थित राहत असू, तेव्हा कदाचित समजत नव्हतं, पण आज जाणवतं की त्या साध्या दिनचर्येतूनच आयुष्याची दिशा निश्चित झाली. मैदानावर उतरून समाजासाठी झटणं, गरजूंना धावून जाणं आणि स्वतःपेक्षा समाजाला मोठं मानणं ही तुमची खरी ओळख, हीच तुमची बलाढ्य समाजसेवा आहे. तुमच्या कार्यामुळे असंख्यांच्या आयुष्यात प्रकाश पडला आहे. आज मोठे बाबांना "भारत गौरव पुरस्कार मिळाल्याचा क्षण आमच्यासाठी अभिमानाचा, आनंदाचा आणि डोळ्यांत अश्रू आणणारा आहे. हा पुरस्कार फक्त तुमचा नाही, तर तुम्ही दिलेल्या संस्कारांचा, तुमच्या त्यागाचा आणि समाजसेवेच्या अखंड प्रवाहाचा सन्मान आहे. तुमच्या पावलावर पाऊल ठेवून सेवा करत राहणे हेच माझं भाग्य, हेच माझे कर्तव्य आणि हाच माझा जीवनसंकल्प.

    आपलाच कृतज्ञ शिष्य, सामाजिक कार्यकर्ताः-शुभम एस. प्रधान (योग शिक्षक संघ गडचिरोली जि. अध्यक्ष)

    आपण करत असलेल्या सामाजिक कार्यासाठी मिळालेला

    " भारत गौरव पुरस्कार " हा धोबी समाजाचा मान उचंवनारा सन्मान आहे... मा. श्नी, कडीखाये काकाजी ला सर्व धोबी समाजा कडून अभिनंदन अभिनंदन




    Photo