विदर्भवार्ता|प्रतिनिधी
वणी : यवतमाळ येथे सन २०२५–२६ या शैक्षणिक वर्षासाठी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, येनक (केंद्र शिंदोला), तालुका वणी येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या स्पर्धेत शाळेचा विद्यार्थी आदित्य तिरणकर याने वैयक्तिक क्रीडा प्रकार बॅडमिटन मध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला.
तसेच विद्यार्थिनी मोहना मडावी हिने कनिष्ठ गट कॅरम स्पर्धेत प्रतिस्पर्ध्यांवर मात करत प्रथम क्रमांक मिळवून शाळेच्या नावलौकिकात भर घातली.
या यशामुळे शाळा, केंद्र व तालुक्याचे नाव जिल्हास्तरावर उज्ज्वल झाले आहे.
विजयी खेळाडूंना मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, पालक तसेच ग्रामस्थांकडून मनापासून अभिनंदन व पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

