ठळक बातम्या

    लोकमान्य टिळक महाविद्यालयात युवा भरारीचे आयोजन

     


    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

    वणी :  विद्यार्थ्यांमधील विविध कलागुणांना वाव मिळावा आणि महाविद्यालयाच्या नियमित बौद्धिक कामकाजात थोडे मनोरंजन देखील व्हावे या दृष्टीने शिक्षण प्रसारक मंडळ वणी संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालय वणीच्या विद्यार्थी विकास विभागाद्वारे दिनांक १९ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत युवा भरारी या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

             गुरूवारी १९ तारखेला शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय मुकेवार तथा सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीत , मोहता सायन्स काॅलेज नागपूरचे प्राचार्य डॉ. जीवन दोंतुलवार यांचे हस्ते या विविध स्पर्धांनी युक्त उत्सवाचे उद्घाटन होईल.

          या स्पर्धांमध्ये गुरुवार, दि. १९ ला रांगोळी,पुष्पगुच्छ सजावट ,पोस्टर प्रेझेंटेशन,स्थळ चित्र,एकल नृत्य या स्पर्धांचे आयोजन होईल. शुक्रवार, दि. २० रोजी माती कला,मेहंदी, रील मेकिंग,समुह नृत्य ,शनिवार, दि. २१ रोजी 

    वक्तृत्व ,वादविवाद ,प्रश्नमंजुषा,

    वारली चित्रकारी तर रविवार, दि. २२ रोजी सुगम संगीत,

    फॅशन शो (मुले /मुली)

    आनंद मेळावा ,ग्रीन व्हेजिटेबल रेसिपी  अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.

    सायंकाळी ०४.०० वाजता

    समारोपीय कार्यक्रमात  या सर्व स्पर्धांमधील तथा महाविद्यालयात झालेल्या क्रीडा सप्ताहातील स्पर्धांच्या यशस्वी स्पर्धकांना बक्षीसे व प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहे.

             विद्यार्थी विकास विभागाचे संयोजक डॉ अभिजित अणे यांच्या नेतृत्वात, लेफ्टनंट, एन.सी.सी. प्रा. किशन घोगरे,  कार्यक्रम अधिकारी, रा. से.यो. डॉ. नीलिमा दवने आणि डॉ. विकास जुनगरी, संचालक, शा. शि. क्रीडा विभाग प्रा. उमेश व्यास, ग्रंथपाल डॉ. गुलशन कुथे तथा निमंत्रित सदस्य  प्रा. महादेव भुजाडे यांच्या संयोजन समितीत विविध प्राध्यापक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या चमूंच्याद्वारे या सर्व स्पर्धा संचालित केल्या जातील. 


    लोकमान्य टिळक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ प्रसाद खानझोडे तथा विद्यार्थी विकास विभाग संयोजक डॉ अभिजित अणे यांच्याद्वारे करण्यात येत आहे.



    Photo